Home » राष्ट्रीय » देशभक्तीच्या रंगात रंगले जिल्हा कारागृह

देशभक्तीच्या रंगात रंगले जिल्हा कारागृह

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने “जीवन गाणे गातच जावे” कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव : प्रतिनिधी

कारागृहातील बंदी हा तसा समाजबाह्य समजला जातो. मात्र या बंद्यांचाही भावनिक विकास होवून, त्यांचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने शासन नियमितपणे वेगवेगळे उपक्रम राबवत असते. समाज विघातक वृत्तीमुळे कारागृहात गेलेल्या बंद्यांचे देशभक्तीपर गाण्यांच्या माध्यमातून समुपदेशन व्हावे. संगीताच्या माध्यमातून प्रबोधन करुन त्यांना सकारात्मक विचारांकडे घेऊन जाण्यासह त्यांच्यांत देशभक्तीची भावना जागवत, गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर घेऊन जाणे या उद्देशाने जळगाव जिल्हा कारागृहात “जीवन गाणे गातच जावे या” हा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या वतीने करण्यात आले होते

जिल्हा कारागृहाच्या कला भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत जिल्हा कारागृह अधीक्षक गजानन पाटील यांनी केले याप्रसंगी वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी जे चव्हाण तुरुंग अधिकारी राकेश देवरे सुभेदार सुभाष खरे श्री खांडरे उपस्थित होते

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार साहेबांच्या संकल्पनेतून व राज्याचे मुख्यमंत्र्याचे अप्पर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यातील सर्व कारागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

कार्यक्रमाचा प्रारंभ स्वर शुभम ग्रुपचे प्रतीथयश कलावंत कपिल घुगे आणि सहकारी यांच्या कला संचाद्वारे करण्यात आली इतनी शक्ती हमे देना दाता या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर विविध देशभक्तीपर गीतांवर कार्यक्रम सादर होत असताना बंदी बांधवांनी टाळ्यांची साथ देत कार्यक्रमाची रंगत वाढवली सादर होत असलेल्या प्रत्येक गीताला भारत मातेचा जयघोष करत कारागृहातील वातावरण देशभक्तीमय झाले होते या कार्यक्रमात कारागृहात बंदीवासात असणाऱ्या दोन बंदिवान बांधवांनी देखील भक्ती गीत व देशभक्ती पर गीते सादर केले

जळगावचे सुप्रसिद्ध लोकशाहीर शाहीर विनोद ढगे व त्यांची दिशा काला पथक संस्थे द्वारे पारंपारिक लोककलेच्या माध्यमातून भारुड सादर करण्यात आले भारुडाच्या माध्यमातून प्रबोधन करताना आयुष्याला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा व व्यसनापासून दूर राहण्याचा जागर त्यांच्या भारूडातून केला

जीवन गाणे गातच जावे या कार्यक्रमात स्वर शुभम ग्रुपच्या व दिशा काला पथकाच्या १५ कलावंतांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन प्रभावी असा संगीतमय कार्यक्रम सादर केला

कार्यक्रमाची सांगता स्वर शिवम ग्रुपच्या कलावंत वर्षा पाटील यांच्या है मालिक तेरे बंदे हम या गीताने झाली

कार्यक्रमाचे समन्वयक विनोद ढगे यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिशा संस्थेचे सचिन महाजन मोहित पाटील अवधूत दलाल संतोष चौधरी विनोद पाटील आकाश भावसार मनोज जैन यांनी परिश्रम घेतले

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *