Home » जळगाव » चारचाकी वाहनात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्ध इसमाची फसवणूक; दोन आरोपींना अटक

चारचाकी वाहनात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्ध इसमाची फसवणूक; दोन आरोपींना अटक

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. चारचाकी वाहनात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्ध इसमाला फसवून २५,००० रुपये रोख रक्कम लंपास केल्याच्या घटनेचा छडा लावत एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपींना ताब्यात घेतले.

सविस्तर वृत्त असे कि, दि.०३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. ७० वर्षीय वृद्ध इसम कालींका माता मंदिराजवळ उभे असताना एक चारचाकी वाहन थांबवून त्यांना लिफ्ट देण्यात आली. काही अंतरावर नेल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील २५,००० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन त्यांना गाडीतून खाली उतरवले व पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद लांडगे, किरण चौधरी व त्यांच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. गोपनीय माहितीवरून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

यात अटक करण्यात आलेले संशयित आरोपी  १. अर्जून शेख रज्जाक शेख (वय ३२), २. रझाकार रेशीम मोहम्मद रईस (वय ३५) (दोघेही रा. रोझा नगर, जळगाव). एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन हस्तगत केली आहे. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक ठाकूर, पोलीस उपअधीक्षक श्री. संदीप गवळी यांनी मार्गदर्शन केले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *