September 24, 2026 8:34 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

आनंद बॅटरी कंपनीतून चोरी : शिसे प्लेट्स, दोन आरोपीसह तीनचाकी रिक्षासह मुद्देमाल जप्त !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरातील ‘आनंद बॅटरी’ या कंपनीत घरफोडी करून सुमारे ९७,००० रुपये किमतीच्या शिसे धातूच्या प्लेट्सची चोरी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला ३२७ किलो वजनाचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली २ लाख रुपये किमतीची […]

चारचाकी वाहनात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्ध इसमाची फसवणूक; दोन आरोपींना अटक

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. चारचाकी वाहनात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्ध इसमाला फसवून २५,००० रुपये रोख रक्कम लंपास केल्याच्या घटनेचा छडा लावत एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपींना ताब्यात घेतले. सविस्तर वृत्त असे कि, दि.०३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० […]

जळगाव : बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील देवगाव शिवारात सोमवारी (दि. ४ ऑगस्ट) दुपारी भीषण घटना घडली. गिरणा धरणाजवळील शेतात काम करत असलेल्या ७३ वर्षीय इंदुबाई वसंत पाटील (रा. देवगाव) या वृद्धेवर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इंदुबाई यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. […]

‘मीच शिवसेनेचा बाप आहे’ ; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भंडारा जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातील निवडणुका पार पडल्या. यानंतर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी एका कार्यक्रमामध्ये ‘मीच शिवसेनेचा बाप आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या विरोधात रोष पाहायला मिळत आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदेसेना हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणय फुके यांनी शिवसेनेची माफी […]

मेहुणबारे पोलिसांची कारवाई : धारदार शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोन अटकेत !

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील उंबरखेड येथील दोन तरुणांना बेकायदेशीरपणे धारदार शस्त्रे बाळगल्याप्रकरणी मेहुणबारे पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहुणबारे पोलिसांना उंबरखेड गावात काही तरुण अवैध शस्त्रे बाळगून परिसरात दहशत निर्माण करत असल्याची गुप्त खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी सुकलाल सुरेश […]

आंतरजातीय विवाहाच्या जोडप्यावर सैराटसारखा हल्ला, पत्नीचं अपहरण, नवऱ्याला मारहाण

पुणे : वृत्तसंस्था खेड तालुक्यातील खरपुडी गावात रविवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी एक धक्कादायक आणि संवेदनशील घटना घडली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी या दाम्पत्यावर प्राजक्ताच्या कुटुंबीयांनी आणि काही नातेवाईकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात विश्वनाथला बेदम मारहाण करण्यात आली, तर प्राजक्ताचे अपहरण करून तिला अज्ञात ठिकाणी घेऊन जाण्यात आले. या प्रकरणाने […]

हिरवांकुर फाउंडेशन नाशिकतर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयाला संगणक संच भेट

जळगाव : प्रतिनिधी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाला हिरवांकुर फाउंडेशनचे अध्यक्ष निलय जैन यांच्यातर्फे संगणक संच भेट देण्यात आला. शाळेमध्ये इको क्लब मार्फत होत असलेली विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण पूरक प्रगती व बदलाचे कौतुक केले. तर, निलय जैन यांनी शिक्षक हा शाळेचा कणा आहे, त्यामुळे त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यावे, असे मत मांडले. शाळेची प्रगती उत्तरोतर […]

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे आज (दि. ४) दुःखद निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावनिक पोस्ट लिहून या वृत्ताला दुजोरा दिला. ‘दिशोम गुरुजी’ या नावाने प्रसिद्ध असलेले शिबू सोरेन हे झारखंडच्या राजकारणातील एक मोठे आणि आदरणीय […]

‘राज’पुत्राचा इशारा :आधी हातपाय तोडा, मगच पोलिसांना द्या !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात मनसे पक्ष अनेक महत्वाच्या भूमिका बजावत असतांना दिसत असतांना आता पुण्यातील कोंढवा भागात आयोजित विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुलींच्या सुरक्षेवरून आक्रमक भूमिका घेतली. “मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडून पोलिसांना द्या,” असा संतप्त इशारा अमित ठाकरे […]

एक लाखांसाठी २८ वर्षीय विवाहितेचा छळ !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील साकळी या गावातील माहेर असलेली एका २८ वर्षीय विवाहितेचा माहेरून पतीला मोटरसायकल घेण्यासाठी एक लाख रुपये आणावे म्हणून दोघांनी छळ केला. ही घटना एप्रिल २०१३ पासून ते जुलै २०२५ दरम्यान घडली. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या काजल […]

error: Content is protected !!