Home » जळगाव » भरधाव रेल्वेचा धक्का लागल्याने वृद्धाचा मृत्यू !

भरधाव रेल्वेचा धक्का लागल्याने वृद्धाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

धावत्या रेल्वेचा धक्का लागून सुरेश धर्मा पाटील (७३, रा. अजिंठा हाऊसिंग सोसायटी) यांचा मृत्यू झाला. ही घटना जळगाव ते शिरसोली दरम्यान घडली. सुरुवातील अनोळखी म्हणून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. नंतर ओळख पटली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते शिरसोली रेल्वे खांबा क्रमांक ४१५ जवळ एका वृद्धाचा मंगळवारी (७ ऑक्टोबर) धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला होता. सुरुवातीला अनोळखी म्हणून नोंद करण्यात आली होती. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला होता. त्यावेळी ओळख पटली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *