खा.कोल्हेंनी काढला मोर्चा अन झाली पोलिसांशी बाचाबाची !

पुणे : वृत्तसंस्था येथील चाकण परिसरातील वाहतूक कोंडी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आज मोठा उद्रेक पाहायला मिळाला. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली चाकणमधील ग्रामस्थ आणि एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, मोर्चेकरांना कार्यालयाच्या आवारात प्रवेश नाकारल्याने अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. मोर्चेकरांना कार्यालयात सोडण्याच्या मुद्द्यावरून अमोल कोल्हे चांगलेच आक्रमक झाले होते. […]
जळगाव जिल्हाधिकारी पदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या रोहन घुगे (भाप्रसे) यांनी गुरुवार दि.09 ऑगस्ट 2025 रोजी आपला पदभार स्वीकारला. यापूर्वी ते जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेला डिजिटल प्रशासन, शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळाले असून ‘कार्यालयीन मूल्यमापन – १०० दिवसांचा […]
…अधिवेशन 3 आठवड्याचे पाहिजे ; आ. रोहित पवारांचा सरकारला सवाल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने हिवाळी अधिवेशन 10 दिवसांचे न घेता 3 आठवडे घेतले पाहिजे. यामध्ये लोकांचे काय म्हणणे आहे, अडचणी ऐकाव्यात हे आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना आणि कोरोना काळात नेहमी सांगत होते की अधिवेशन 3 आठवड्याचे पाहिजे, शेतकरी अडचणीत असताना हे अधिवेशन 3 आठवड्याचे का नसावे असा सवाल आम्ही […]
अंजली दमानिया यांनी केली मंत्री कदम यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरूवारी गँगस्टर नीलेश घायवळ याच्या भावाला शस्त्र परवाना देऊन अडचणीत सापडलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गुन्हेगारांना मोठे करणारे व डान्सबार असणारे मंत्री महाराष्ट्राने का सहन करावेत? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गँगस्टर गुंड नीलेश […]
जळगावात ‘वॉश आऊट’ मोहीम : रेकॉर्डवरील गुन्हेगारांना घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलिसांनी गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर कोंबिंग ऑपरेशन राबवले. ‘वॉश आऊट’ या विशेष शोध मोहिमेअंतर्गत झालेल्या धडक कारवाईत ८४ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. ही मोहीम पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जळगाव शहरातील विविध संवेदनशील भागांमध्ये […]
महायुती सरकारने दिली लाडक्या बहिणींना दिवाळीची खुशखबर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी वित्त विभागानं ४१० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केली आहे. लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागानं ४१०.३० कोटी रूपये निधीला मंजुरी दिली आहे. यासाठी वित्त विभागानं […]
कॉफी शॉपच्या नावाखाली कॅफेमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे !

जळगाव : प्रतिनिधी कॉफी शॉपच्या नावाखाली सुरू असलेल्या कॅफेमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असलेल्या दुकानावर रामानंद नगर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) दुपारी केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांत कॅफे चालविणारा मयूर धोंड्डू राठोड (२५, रा. कोल्हे हिल्स) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोल्ड जीमच्या पुढे काही अंतरावर चॅट अड्डा नावाने […]
भरधाव रेल्वेचा धक्का लागल्याने वृद्धाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेचा धक्का लागून सुरेश धर्मा पाटील (७३, रा. अजिंठा हाऊसिंग सोसायटी) यांचा मृत्यू झाला. ही घटना जळगाव ते शिरसोली दरम्यान घडली. सुरुवातील अनोळखी म्हणून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. नंतर ओळख पटली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते शिरसोली रेल्वे खांबा क्रमांक ४१५ जवळ एका वृद्धाचा मंगळवारी (७ ऑक्टोबर) […]
बोगस कॉल सेंटर प्रकरणात ललित कोल्हे यांची नाशिक कारागृहात रवानगी !

जळगाव : प्रतिनिधी जळगावातील बोगस कॉल सेंटरमधून ज्या विदेशी नागरिकांची फसवणूक झाली व त्यांनी त्या-त्या देशात तक्रार दिली असेल, त्याची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे (रा. कोल्हे नगर) व राकेश चंदू अगारिया (रा. वाघ नगर) या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. […]
तुमच्यात होणारे बदल इतरांना सकारात्मक वाटणार !

मेष राशी आज तुमच्या प्रार्थनेला लवकरच फळ मिळेल. तुम्ही तुमच्या कृतींवर लक्ष केंद्रित कराल आणि सकारात्मक राहाल. कोणतीही समस्या तुमच्या स्वतःच्या कृतींद्वारे सोडवली जाईल. आज इतरांवर जास्त अवलंबून राहणे टाळल्याने तुमची कामगिरी सुधारेल. मानसिक शांती लाभेल. वृषभ राशी आज, तुमची मुले करत असलेल्या एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला दुःख होऊ शकते. जर तुम्ही शांतपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न […]