Home » जळगाव » भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी

भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पाथरी येथे बाबुराव परभत खरात (वय ७७, रा. पाथरी) यांना अनोळखी दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. हा अपघात दि. २१ मार्च झाला. दुचाकीस्वार पळून गेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील पाथरी येथील बाबुराव खरात हे वृद्ध वास्तव्यास आहे. दि. २१ रोजी दुपारच्या सुमारास ते गावातील मारोती मंदिराजवळून पायी घरी जात असतांना त्यांना भरधाव दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यामध्ये वृद्ध गंभीर जखमी झाले असून धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार हा तेथून पळून गेला. उपचार घेतल्यानंतर वृद्ध बाबुराव खरात यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स्वप्निल पाटील करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *