Home » जळगाव » दोन हजारांची लाच घेताना कर्मचारी अटकेत !

दोन हजारांची लाच घेताना कर्मचारी अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी

आपल्याच कर्मचाऱ्यांच्या आश्वसित प्रगती योजनेचा हप्ता व वेतन निश्चितीसाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अमळनेर पालिका कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज साहेबराव निकुंभ असे या लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पाणीपुरवठा कर्मचारी गणेश शिंगारे याच्या सुधारित आश्वसित योजनेचा दुसरा हप्ता तसेच वेतन निश्चिती झाली नव्हती म्हणून त्यांनी मनोज निकुंभ या कर्मचाऱ्यांची भेट घेतली असता त्याने मला दोन हजार रुपयांची मागणी करीत मुख्याधिकाऱ्यांकडून मंजूर करून आणतो, असे सांगितले. याबाबत शिंगारे यांनी २१ ऑक्टोबर २०२४ रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. यानंतर निकुंभ यांनी लाच घेतली नाही. मात्र रेकॉर्डरमध्ये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते. अखेरीस मनोज निकुंभयांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *