Home » जळगाव » भुसावळ तालुक्यात खळबळ : तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

भुसावळ तालुक्यात खळबळ : तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

भुसावळ : प्रतिनिधी

निंभोरा बुद्रुक (ता. भुसावळ) येथे अज्ञात तिघांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार गौतम हरी साळवे (वय ३४, व्यवसाय मजुरी, रा. राम मंदिराच्या मागे, निंभोरा बुद्रुक) हे घरासमोरील अंगणात उभे असताना अज्ञात आरोपी भरधाव वाहनातून येत अश्लील शिवीगाळ करू लागले. त्यातून वाद निर्माण झाला. याचवेळी आरोपींपैकी एकाने चाकू काढून गौतम साळवे यांच्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच आरोपींनी त्यांच्या वडिलांनाही शिवीगाळ करून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

हल्ल्यानंतर जखमी गौतम साळवे यांना तातडीने भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपनिरीक्षक पूजा अंधारे पुढील तपास करीत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके कार्यरत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *