April 26, 2025 7:38 am

Home » गुन्हे » प्रसिद्ध बिल्डरने स्वतःवर गोळी झाडून संपविले आयुष्य !

प्रसिद्ध बिल्डरने स्वतःवर गोळी झाडून संपविले आयुष्य !

नवी मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बेलापूर येथील किल्ले गावठाण परिसरात एका प्रसिद्ध बिल्डरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास या बिल्डरने आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी ९ एमएमच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गुरू चिचकर असं आत्महत्या करणाऱ्या बिल्डरचं नाव आहे. त्यांनी शुक्रवारी सकाळी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत मोठं ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं होतं. मुंबईच्या अमली पदार्थ पथकाकडून नवी मुंबईत मोठी कारवाई करत 200 कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणात मयत गुरू चिचकरच्या दोन्ही मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका मुलाला अटक केली होती, तर दुसरा मुलगा फरार झाला होता. अटकेतील मुलगा सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

याच ड्रग्ज प्रकरणात गुरू चिचकर यांना NRI पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. याच चौकशीच्या विवंचनेतून चिचकर यांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत.

मुलांच्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांकडून सातत्याने छळ केला जात होता, यातूनच आपण जीवन संपवतोय, असे गुरू चिचकर यांनी आपल्या सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. एका प्रसिद्ध बिल्डरनं अशाप्रकारे जीवन संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *