Home » राष्ट्रीय » जळगावात नेत्याच्या नावावर कामगार लाभार्थींची आर्थिक फसवणूक !

जळगावात नेत्याच्या नावावर कामगार लाभार्थींची आर्थिक फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अनेक शहरासह ग्रामीण भागात बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात असून राज्य सरकारच्या अनेक योजना कामगारांसाठी असतात आता भांडी योजना मोठ्या प्रमाणात सुरु असतांना यात आता लाभार्थी कामगारांना भांडी वाटप मोफत देण्याचे आदेश असतांना देखील शहरापासून नजीक असलेल्या एका गावातील एका ठिकाणी २०० रुपये देवून भांडी कामगारांना मिळत होती. विशेष म्हणजे या ठिकाणी जे कर्मचारी पैसे घेत होते त्यांच्या खिश्यावर व मोबाईलवर जिल्ह्यातील एका नेत्याचे फोटो लावलेला होता. म्हणजे त्या नेत्याच्या फोटो व नावावर हि लाभार्थीची आर्थिक लुट सुरु असल्याचे चित्र आज दि.२२ रोजी सकाळी समोर आले आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळद्वारे बांधकाम कामगार भांडी योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत, पात्र बांधकाम कामगारांना घरेलू भांडी सेट मोफत दिला जात असतो. यात 30 वस्तूंचा हा सेट असून कामगारांना स्वतःचे स्वयंपाक घर बनवण्यासाठी उपयुक्त ठरत असतो.  तर जळगाव शहरापासून नजीक असलेल्या एका ठिकाणी आज सकाळी ९ वाजेपासून कामगारांना भांडी वाटप सुरु करण्यात आले होते. यावेळी शेकडो कामगारांनी लांबच लांब रांग लावून ठेवली होती. यावेळी शेकडो लाभार्थ्यांनी या ठिकाणी २०० रुपये भरून भांडी घेण्याचा लाभ घेतला तर याठिकाणी काही महिलांशी संवाद साधला असता, नाव न सांगण्याच्या अटीवर  ते म्हणाले कि, यापूर्वी नोंदणी व केवायसी करण्यासाठी एकूण एक हजार १०० रुपये तर भांडी घेतांना २०० रुपये व शिक्का घेण्यासाठी ५० रुपये प्रत्येक लाभार्थीकडून घेण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय योजनेचा चांगलाच फज्जा जळगाव शहरात उडत असल्याचे समोर आले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *