Home » जळगाव » कुरिअर कर्मचाऱ्याच्या घरावर गोळीबार : पाच जणांना केली अटक !

कुरिअर कर्मचाऱ्याच्या घरावर गोळीबार : पाच जणांना केली अटक !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कुसुंबा येथील गणपतीनगरात शनिवार, ४ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास चंद्रशेखर त्र्यंबक पाटील या कुरिअर कर्मचाऱ्याच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार आणि जोरदार दगडफेक केल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुणीही जखमी झालेले नाही.

पाच याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून रविवारी जणांना अटक केली आहे. दुचाकीवरून उतरलेल्या ८ ते १० हल्लेखोरांनी आधी शिवीगाळ करत चंद्रशेखरच्या घराच्या दिशेने जोरदार दगडफेक केली. त्यात खिडक्यांच्या काचा फुटल्या. यानंतर हल्लेखोरांनी घराबाहेर लावलेली दुचाकीही फोडली. याप्रकरणी किरण खर्चे, सचिन सोनवणे, गणेश उर्फ विकी ज्ञानेश्वर, हर्षल महाडिक, निखिल चव्हाण, रवी राठोड, राकेश पाटील, दिनेश पवार अशा ८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पोलिसांनी शोधकार्य सुरू करीत पाच जणांना अटक केली आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *