Home » जळगाव » पहिल्यांदा होणार जिल्ह्यात दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर

पहिल्यांदा होणार जिल्ह्यात दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जळगाव : प्रतिनिधी

छत्रपती संभाजी नगर येथील प्रसिद्ध वैद्य सूफी हकीम अब्दुल मतीन अशरफी हे जळगाव जिल्ह्यात येत असून भुसावळ येथे दि.१३ व १४ जून रोजी दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात ५ प्रकारच्या उपचार पध्दतींचा उपयोग केला जाणार असून सोमवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. हकीम अब्दुल मतीन यांची तिसरी पिढी आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत आहे.

भुसावळ येथील वेलकम मॅरेज लॉन्स येथे दि.१३ व १४ जून रोजी सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचा अंदाजे ७०० ते ८०० नागरिक लाभ घेतील असा अंदाज असून एकाच वेळी १० रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. शिबिरात लेपन, पीन पोटली, शिरोधारा, शेक, फिजिओथेरपीद्वारे उपचार केले जाणार आहे.

शिबिरात प्रामुख्याने मायग्रेन, डोकेदुखी, तणाव, चिडचिडपणा, अनिद्रा, अपचन, गॅसेस, एसिडिटी, सुटलेले, फुगलेले पोट, भूक मंदावणे, हात पाय ओढले जाणे, सांधे दुखी, नस दबणे, मणक्याचे आजार यावर उपचार केले जाणार आहेत. शिबिरासाठी सूफी हकीम अब्दुल मतीन अशरफी यांच्यासह मौलाना अतिउर रेहमान, मोहतरम अय्युब शाह गुलाब शाह, वाहीद शाह, अब्दुल रहीम शाह हे परिश्रम घेत आहेत. शिबिरात नाव नोंदणीसाठी 9370183052 / 9823315312 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशा आहेत उपचार पद्धती
मट थेरपीमध्ये जमिनीतून ८ फूट खोलीवरून माती काढून २ दिवस पाण्यात भिजवून उपचार केला जातो. पीन पोटली उपचार पद्धतीत आयुर्वेदिक झाडांचे पान तिळाच्या तेलात गरम करून मालिश केली जाते. शिरोधारामध्ये आयुर्वेदिक तेलाने कपाळावर धार सोडून उपचार केले जातात. सेका सुखी पोटली उपचारात सेंधव मीठ आणि इतर औषधांनी गरम शेक दिला जातो. फिजिओथेरपीद्वारे दबलेल्या नस आणि इतर वेदना दूर केल्या जातात.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *