जळगाव : प्रतिनिधी
जुन्या वादातून ज्ञानेश रत्नाकर मोरे (३८) व त्यांचे भाऊ हितेश रत्नाकर मोरे (३६) दोन्ही रा. अयोध्यानगर यांना चार जणांनी मारहाण केली. ही घटना ११ ऑगस्ट रोजी अयोध्यानगरातील राका चौकात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश मोरे हे राका चौकात उभे असताना चार जणांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यावेळी हितेश मोरे हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी हितेश मोरे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि अशोक काळे करीत आहेत.



