Home » ताज्या » दोन वेगवेगळ्या अपघातात : चार जण ठार तर दोन सख्ख्या भावांचा समावेश !

दोन वेगवेगळ्या अपघातात : चार जण ठार तर दोन सख्ख्या भावांचा समावेश !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. यातील एक नवविवाहित आहे. पहिला अपघात अभोडा, (ता. रावेर) नजीक सायंकाळी ४ वाजता तर दुसरा अपघात वर्डी- माचला, (ता. चोपडा) नजीक सोमवारी सायंकाळी ४:३० वाजता झाला.

सविस्तर वृत्त असे कि, रामदास प्रकाश बारेला (१९) आणि करण प्रकाश बारेला (आठ वर्षे, रा. गुलाबवाडी ता. रावेर) हे सख्खे भाऊ अभोडानजीक तर मगन जगन बारेला (२५) व रंगन जगन बारेला (१८, रा. वर्डी ता. चोपडा) अशी वर्डीनजीकच्या अपघातात ठार झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. रामदास बारेला याचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले होते. रामदास व करण हे रसलपूर (ता. रावेर) येथे बहिणीला भेटण्यासाठी गेले होते. तिथून दुचाकीने परत येत असताना अभोडा गावानजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली, त्यात दोघे जण ठार झाले. तर वर्डी-माचला फाट्यादरम्यान मगन आणि रगन बारेला यांच्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिली. यात दोघे जण ठार झाले. या अपघातप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *