Home » राष्ट्रीय » जबरी चोरीतील फरार संशयित पोलिसांच्या ताब्यात !

जबरी चोरीतील फरार संशयित पोलिसांच्या ताब्यात !

भुसावळ : प्रतिनिधी

सातत्याने पोलीसांच्या नजरेतून सुटत असलेल्या आणि जबरी चोरीप्रकरणी साडेतीन महिन्यांपासून फरार असलेल्या आशिक बेग असलम बेग ऊर्फ बाबा काल्या (रा. खडका रोड, भुसावळ) याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने फैजपूर शहरातून जेरबंद केले.

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ७ मे २०२५ रोजी जबरी चोरीचा गंभीर गुन्हा नोंदवला गेला होता. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आशिक बेग हा गुन्हा घडल्यानंतर पसार झाला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी LCB ला आरोपीला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले होते.

२७ ऑगस्ट रोजी LCB ला गुप्त माहिती मिळाली की, बाबा काल्या फैजपूर येथील हॉटेल हॉटस्पॉट मध्ये लपून बसला आहे. या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक शरद बागल व रवी नरवाडे यांच्या पथकाने फैजपूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.अटक केलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
त्यासाठी LCB चे उपनिरीक्षक शरद बागल, रवी नरवाडे, हवालदार गोपाळ गव्हाळे, उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे तसेच फैजपूर पोलिस ठाण्याचे सपोनि रामेश्वर मोताळे, पोउपनि मैनुद्दीन सैय्यद व पोकॉ जुबेर शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *