मुक्ताईनगर : प्रतिनिधी
दुतोंडी साप, कासव व अन्य वन्य प्राण्यांचे तसेच नकली नोटांचे आमीष दाखवत परराज्यातील लोकांना जंगलात बोलावून लुटमार करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली.

पवन दिनेश गौर (रा. आडगाव खुर्द, जि. हरदा), अरविंदकुमार काशीराम राठोड (रा. हरदा), राजेश शंकरलाल साहू (रा. शहापूर जि. बऱ्हाणपूर), चेतन सुरेश श्रीवास्तव (रा. लालबाग, जि. बऱ्हाणपूर), गोपाल श्रीराम यादव (रा. शिवनी माधवा ता. नर्मदापूर) आणि चेतन गोविंद यादव (रा. न्यू कॉलनी, ब-हाणपूर) यांचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नयन पाटील हे पुढील तपास करीत आहेत.



