Home » महाराष्ट्र » गोलाणी मार्केट परिसरात चाकू हल्ला; तरुण गंभीर जखमी

गोलाणी मार्केट परिसरात चाकू हल्ला; तरुण गंभीर जखमी

जळगाव : प्रतिनिधी

शहरात जुन्या वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव महानगरपालिकेजवळील गोलाणी मार्केट परिसरात घडली. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या गडबडीत शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक अर्जांची छाननी सुरू असताना गर्दीच्या ठिकाणी कांचन नगर येथील शुभम रवींद्र सोनवणे याने धनाजी नाना महाविद्यालयाच्या मागे राहणाऱ्या यश (पूर्ण नाव अद्याप समजले नाही) याच्यावर चाकूने वार केला. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले.

या प्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *