Home » राष्ट्रीय » देशात सोन्याच्या दराने गाठला पुन्हा उच्चांक !

देशात सोन्याच्या दराने गाठला पुन्हा उच्चांक !

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता 16 एप्रिल 2025 रोजी देशभरातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सध्या वाढीचा कल अधिक आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर मंगळवारी 93,353 रुपयांवरून कमी होऊन 93,102 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दुसरीकडे, चांदीचा दर 92,929 रुपयांवरून 95,030 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 50 रुपयांनी वाढून 96,450 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. हा आतापर्यंतचा उच्चांकी दर आहे. 99.5 टक्के शुद्धतेचे सोने म्हणजेच 23 कॅरेटचे सोने 50 रुपयांनी वाढून 96,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

वाढत्या मागणीमुळे चांदीचा दर तब्बल 2,500 रुपयांनी वाढून 97,500 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. सोमवारच्या तुलनेत हा दर 2.63 टक्क्यांनीनी वाढला आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *