जळगाव : प्रतिनिधी
जुन्या वादातून मारहाण करण्यासह चाकूने वार करून शंतनू चंद्रकांत गुरव (वय १९, रा. पंढरपूर नगर) या तरुणाच्या खिशातून दोन हजार रुपये जबरीने काढून नेले. तसेच तरुणाच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. ही घटना दि. १५ ऑक्टोबर रोजी रात्री एमआयडीसी परिसरात घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पंढरपूर नगरात शंतनू गुरव हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १५ रोजी शंतनू हा त्याचा मित्र अनिकेत उर्फ सोनू राजू निंबाळकर हे औद्योगिक वसाहत परिसरात एका हॉटेलजवळ उभे होते. त्याठिकाणी दीपक पटेल, कुणाल पाटील, राहुल भोसले, प्रवीण राठोड (सर्व रा. कुसुंबा, ता. जळगाव) हे आले. त्यांनी मागील वादावरून त्यांनी दोघं मित्रांना मारहाण केली. तर कुणाल पाटील याने चाकूने वार करून रोख दोन हजार रुपये व आधारकार्ड काढून घेतले. या प्रकरणी शंतनू गुरव याने दि. १७ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
