Home » जळगाव » भुसावळ » भरधाव ट्रॅक्टरची धडक; दुचाकीस्वार शकील तडवी यांचा जागीच मृत्यू !

भरधाव ट्रॅक्टरची धडक; दुचाकीस्वार शकील तडवी यांचा जागीच मृत्यू !

यावल : प्रतिनिधी

अडावद–यावल रोडवर धानोरा गावाजवळ गुरुवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शकील सलाउद्दीन तडवी (रा. आडगाव, ता. यावल) असे मयताचे नाव आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास महावितरण कार्यालयासमोर हा अपघात घडला.

सविस्तर वृत्त असे की, शकील तडवी हे दुचाकी (एमएच १९ डीपी ९६९१) ने अडावदहून आडगावकडे जात होते. याच दरम्यान धानोरा गावातील एमएसईबी कार्यालयासमोर ट्रॅक्टर (यूपी ७९ एसी ८३२२) चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे रस्त्यावर उतरत दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत शकील रस्त्यावर फेकले गेले व डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची वार्ता समजताच तडवी कुटुंबावर शोककळा पसरली. अडावद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आडगाव येथील सुपडु वासुदेव पाटील यांच्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टर चालक छोटूसिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *