जळगाव : प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद चौधरी यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना बैलपोळा सणानिमित्त साज व आवश्यक उपयोगी साहित्य वितरित करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

जळगाव तालुक्यातील भादली बु. येथील शेतकऱ्यांना बैलांसाठी आवश्यक असणारे साज आणि इतर उपयोगी साहित्य आज दि.१७ ऑगस्ट २०२५ रोजी वाटप करण्यात आले. हा उपक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि माजी सरपंच मिलिंद चौधरी यांनी आयोजित केला होता.सदरील कार्यक्रम पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमातील ठळक मुद्दे: पालकमंत्र्यांचे कौतुक: पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी मिलिंद चौधरी यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, शेती, माती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असणारी व्यक्तीच अशा प्रकारचा उपक्रम राबवून शेतकऱ्यांच्या ऋणात राहू शकते. तसेच यापुढे शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या कृषी संलग्न व्यवसाय, प्रक्रिया उद्योग व इतर विषयांचे प्रशिक्षण व इतर कार्यक्रम आपल्या गाव पातळीवर घेण्यास मिलिंद चौधरी यांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान यावेळी केले. तसेच शेतकऱ्यांनी शेती सोबतच जोडव्यवसाय करावा जेणेकरून नैसर्गिक आपत्तीवेळी होणाऱ्या नुकसानी पासून कुठेतरी मोठा फटका बसणार नाही व आयुष्यात प्रगती साधण्यास मदत होईल असे यावेळी मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांचा खर्च वाचला: यावेळी गावातील सुमारे २७५ बैलजोडी धारक शेतकऱ्यांना हे साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे पोळ्याच्या सणासाठी होणारा शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाचला, असे शेतकऱ्यांनी सांगितले. मिलिंद चौधरी हे एक सामान्य शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणारे कार्यकर्ते आहेत, असे गौरवउद्गारही शेतकऱ्यांनी काढले.
या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी पंचायत समिती सदस्य तुषार महाजन, सरपंच मनोज चौधरी, माजी उपसरपंच संदीप कोळी,ग्रामपंचायत सदस्य अरुण सपकाळे, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक किरण रडे प्रमोद चौधरी परेश रडे, किशोर चौधरी, छोटू कोळी, विजू कावळे, मनोज इंगळे पिंटू कोळी किशोर कोळी गणा आतरदे किसन चौधरी कौस्तुभ झांबरे, गोलू चौधरी,गणेश गोळी, रामचंद्र अत्तरदे, परेश लोखंडे, नरू कोल्हे, राजेंद्र चिनवल, प्रेमचंद झोपे, शुभम रडे, धनराज रडे लकी, शीताराम अतरदे, दिलीप नारखेडे राहुल चिनवले इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ ढाके यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद चौधरी आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरपंच मनोज चौधरी यांनी केले.



