September 26, 2026 1:35 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

महाराष्ट्रातील माणसाला सर्वांनी समर्थन द्यावे ; मुख्यमंत्र्यांचे आवाहन !

मुंबई : वृत्तसंस्था उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची २१ ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. यासंदर्भात भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जेपी नड्डा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा […]

हतनूर धरणातून 56 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नदीपात्रा जवळच्या गावांना सुरक्षिततेसाठी आवाहन

जळगाव : प्रतिनिधी हतनूर धरणाच्या (पूर्णा व तापी नदीच्या) पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस व वाढलेला येवा तसेच धरण पातळीत झालेली वाढ लक्षात घेऊन आज दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता धरणातून 1598.00 क्युमेक्स (56433.37 क्युसेक्स) इतका प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यासाठी धरणाची 04 गेट पूर्णपणे व 16 गेट प्रत्येकी 1.00 मीटर इतकी […]

जळगावात मध्यरात्री थरार: रामेश्वर कॉलनीतील तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या!

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका भीषण घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. रामेश्वर कॉलनीतील २६ वर्षीय विशाल ऊर्फ विकी रमेश मोची या तरुणाची ६ ते ७ अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिराशेजारील एमएसईबी कार्यालयाजवळ घडली. मिळालेल्या […]

‘शेतकऱ्यांचा सण, सन्मानाने साजरा’ – बैलांसाठी मोफत साज साहित्य वितरण !

जळगाव : प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद चौधरी यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना बैलपोळा सणानिमित्त साज व आवश्यक उपयोगी साहित्य वितरित करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. जळगाव तालुक्यातील भादली बु. येथील शेतकऱ्यांना बैलांसाठी आवश्यक असणारे साज आणि इतर उपयोगी साहित्य आज दि.१७ ऑगस्ट २०२५ रोजी वाटप करण्यात आले. हा उपक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक […]

फर्निचर दुकानाला भीषण आग : एकाच कुटूंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. नेवासा शहरातील कालिका फर्निचर दुकानाला भीषण आग लागून एकाच कुटूंबातील पाच जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. १८) मध्यराञी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकाच कुटूंबातील पती – पत्नी आजी आणि त्यांच्या दोन बालकांचा […]

अजित पवारांचा मला ‘टॉर्चर’ करण्याचा प्रयत्न ; राम शिंदे !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच रोहित पवार यांना उद्देशून केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. ‘जर भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास,’ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यावरून आता भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित […]

“तुम्ही तरी उठा!”- अण्णा हजारेंना उद्देशून आंदोलनाची हाक

पुणे : वृत्तसंस्था देशातील काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचा डेटा दाखवत मतांची चोरी झाल्याचे दाखवले. त्यावरून विरोधक आक्रमक होत रस्त्यावरदेखील उतरले. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. या सर्व घडामोडीदरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना लक्ष्य करणारे होर्डिंग पुण्यातील पाषाण येथील रस्त्यावर लावण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे […]

पाय घसरून पडल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पारोळा : प्रतिनिधी पाटाच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी गेलेला ३८ वर्षीय तरुणाच्या पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील मोहाडी येथील सुनील अनिल भील (वय ३८) असे मृत तरुणााचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भोकरबारी धरणाला लागून असलेल्या पाटाचा पाण्यात रविवारी सुनील भील हे मासे पकडण्यासाठी गेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास मासे […]

दारूच्या नशेत बापाचा धिंगाणा : आईसह मुलीला केली जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील चंदू अण्णा नगर परिसरात अभ्यास करणाऱ्या मुलीने मोबाईलवर सुरू असलेले गाणे बंद केले. त्यामुळे रागाच्या भरात दारुच्या नशेत असलेल्या बापाने तिला कुकरच्या झाकणाने मारले. तर काचेचा ग्लास फोडून पत्नीलाही मारहाण केली. ही घटना दि. १५ रोजी  घडली. या प्रकरणी समाधान विजयसिंग पाटील (वय ३२, रा. चंदू अण्णा नगर) याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्याती […]

विमानतळावर जवळ भरधाव कारची रिक्षाला धडक !

जळगाव : प्रतिनिधी रस्ता ओलांडून डिझेल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर जाणाऱ्या रिक्षाला भरधाव कारने धडक दिल्यामुळे रिक्षाचालकासह पाच जण जखमी झाले. हा अपघात १५ ऑगस्ट रोजी रात्री विमानतळाच्या पुढे झाला. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रिक्षाचालक साहिल राजेंद्र भोई (२२, रा. खडकी, ता. जामनेर) हे रिक्षामध्ये (क्र. एमएच १९ बीएम ०५४६) घरगुती साहित्य घेऊन […]

error: Content is protected !!