Home » जळगाव » हॉटेलमालकाचा तगादा अन चालकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोट व्हायरल !

हॉटेलमालकाचा तगादा अन चालकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोट व्हायरल !

जळगाव : प्रतिनिधी

भाडेतत्त्वावर घेतलेल्या हॉटेलमध्ये मोठा खर्च केल्यानंतर ती खाली करून देण्यासाठी सतत तगादा लावल्याने त्यास कंटाळून हॉटेल चालक आशिष मधुकर फिरके (४८, रा. सांगवी, ता. यावल, ह.मु. संत निवृत्ती नगर, जळगाव) यांनी रौनक हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (१४ सप्टेंबर) मध्यरात्री दीड वाजता समोर आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आशिष फिरके यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटनुसार, ते रिंगरोडवरील जागेत तीन वर्षापासून हॉटेल व्यवसाय करीत होते. यासाठी जागा मालकाला तीन वर्षाचे अॅग्रीमेंट करून दिले होते. जागा मालक सतत तगादा लावत होता. तसेच वेळोवेळी त्याचा मुलगाही खूप धमक्या देत होता. त्यामुळे आत्महत्या करीत आहे, असे सुसाईड नोटमध्ये नमूद करून व ती स्टेटसवर ठेवून आशिष फिरके यांनी रिंग रोडवरील हॉटेल रौनकमध्ये रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गळफास घेतला. फिरके यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. आशीष फिरके यांनी रात्री १२:४० वाजता सुसाईट नोटचे स्टेटस ठेवले होते. फिरके यांच्या एका ग्राहकाला रात्री ते दिसले. त्यानंतर ते जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पोहोचले व या विषयी माहिती दिली. त्यावेळी पोउनि शांताराम देशमुख, पोहेकॉ महेंद्र पाटील हे या ग्राहकाला घेऊन हॉटेलमध्ये पोहचले. फिरके हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.

काय लिहिले सूसाईट नोटमध्ये ?

मी आशीष मधुकर फिरके असे लिहून देतो की, माझ्या मौतीला जबाबदार फक्त आणि फक्त रामसहाय शर्मा म्हणजे हॉटेल रोनक या जागेचे मालक. मी त्यांच्या जागेत तीन वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करतो. मला यांनी आधी तीन वर्षांचे अॅग्रीमेंट करून दिले होते आणि आता मला सागितले की, बेटा टेन्शन मत ले, मै अॅग्रीमेंट तीन साल का कर दूंगा. त्यांनी मला सांगितले तू तेरे हिसाबसे हॉटेल बना ले. मी खूप खर्च पण लावला आणि आता अचानक त्यांनी मला जागा खाली करून दे असे सतत टॉचिंग करत होते. मी खूप विनंती करूनही मला त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले. मी त्यांना सांगितले की, मला दोन लहान मुले आहे, त्यांचा तरी विचार करा. तर ते मला म्हटले की मुझे कुछ लेना देना नही आणि मला खूप टॉचिंग करत होते. वेळोवेळी त्यांचा मुलगा रजनील रामसहाय शर्मा यांनी खूप धमक्या दिल्या म्हणून मी आत्महत्या करत आहे. – आशीष मधुकर फिरके

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *