Home » जळगाव » बॅटरीचा स्फोट होवून घराला लागली आग !

बॅटरीचा स्फोट होवून घराला लागली आग !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील आनंदनगर परिसरात गुरुवारी रात्री सुमारे पावणेनऊच्या सुमारास इन्व्हर्टर बॅटरीचा अचानक स्फोट होऊन घरात आग लागली. या आगीत घरातील गादी, चादरी व इतर साहित्य जळून नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

ही घटना पुरुषोत्तम गाजरे यांच्या घरी घडली. बॅटरीचा स्फोट होताच आगीने रौद्ररूप धारण केले. परिस्थिती गंभीर होण्याआधीच जितेश ढाके, गिरीश कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत अग्निरोधक सिलिंडरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. काही वेळातच भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला आणि संपूर्ण आग विझविण्यात आली.

स्फोटामुळे परिसरात घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली होती. मात्र, स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे आणि अग्निशमन पथकाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *