Home » जळगाव » भुसावळ » पती – पत्नी भिडले अन पतीने मारले हातावर ब्लेड

पती – पत्नी भिडले अन पतीने मारले हातावर ब्लेड

भुसावळ : प्रतिनिधी

पती-पत्नीच्या आपसात झालेल्या भांडणात संतप्त पतीने पत्नीला मारहाण करीत गळ्यावर व डाव्या हातावर ब्लेड मारून जखमी केले.

सविस्तर वृत्त असे कि शबनमबी वसीम शहा (२१, पंचशीलनगर) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, आरोपी पती वसीम शहा बरकत शहा (पंचशील नगर, भुसावळ) याने कौटुंबिक वादानंतर शिवीगाळ केली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी पत्नीला मारहाण केली. तसेच हातावर व गळ्यावर ब्लेडने वार केले यात जी गंभीर जखमी झाली आहे.. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *