Home » राष्ट्रीय » महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून जळगावातील अवैध वाळू चोरांची दिवाळी जल्लोषात !

महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून जळगावातील अवैध वाळू चोरांची दिवाळी जल्लोषात !

जळगाव : प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एका तलाठ्याला वाळू माफियांनी धावत्या ट्रॅक्टर वरून खाली फेकल्याची घटना घडली असल्यावर देखील जळगाव जिल्हा महसूल प्रशासनातर्फे या वाळूमाफियांवर अद्याप कुठलेही कारवाई झाली नसून जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा वाळू चोरी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.

नवनियुक्त जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपला पदभार सांभाळला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चोपडा तालुक्यातील एका तलाठ्याला अवैध वाळू वाहतूकदारांनी आपल्या ट्रॅक्टर वरून खाली ढकलण्याची घटना घडली होती त्यानंतर जळगाव महसूल प्रशासन कारवाईचा बळगा उचलणार अशी चर्चा सुरू असताना देखील जळगाव शहराला लागून असलेल्या गिरणा नदीतून पुन्हा एकदा अवैध वाढू वाहतूक सुरू झाली आहे. रात्री आठ वाजेपासून ही अवैध वाळू वाहतूक सुरू होते तर पहाटे नऊ वाजेपर्यंत सुरू असून यावर महसूल विभागातून कुठलीही कारवाई होत नसल्याचे समोर येत आहे.

पंधरा दिवसांची परवानगी का ?
गिरणा नदी पात्रातून रात्रीच्या वेळेस अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये दिवाळीचा सण असल्यामुळे कुठलाही अधिकारी यांच्यावर पंधरा दिवस कारवाई करणार नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. जिल्हा महसूल प्रशासनातील एका बड्या अधिकाऱ्याने असे वाळू चोरांजवळ कबूल केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी वाळू वाहतूकदारांसाठी अतिशय जल्लोषात होणार असल्याचे देखील समजते.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *