November 8, 2026 6:02 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » पारोळ्यात भीषण अपघात : जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षक ठार !

पारोळ्यात भीषण अपघात : जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षक ठार !

जळगाव : प्रतिनिधी

जुन्या राष्ट्रीय महामार्गावरून घरी परत येत असताना शिक्षिकेला येणाऱ्या कारने भरधाव वेगाने धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि. १४ रोजी  सायंकाळी घडली. भावना प्रशांत मुळे (५३, श्रीनाथजीनगर, पारोळा) असे त्यांचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, भावना या पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील जि.प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्या सायंकाळी ५ वाजता शाळेचे कामकाज संपवून घरी परत येत होत्या. जुन्या महामार्गापासून काही अंतरावर त्या दुचाकीवरून (एमएच-१९/बीटी०५७२) येत होत्या, तेव्हा रस्त्याचे काम सुरू होते. अचानक समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (जीजे२६/एके१७५०) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही कार समाधान दिगंबर पाटील (अंतुर्ली, ता. पाचोरा) हा चालवत होता. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलिस ठाण्यात झाली नव्हती.

भावना मुळे याआधी भोकरबारी (पारोळा) येथे कार्यरत होत्या. मात्र, गेल्या महिन्यात त्यांची म्हसवे येथील जि.प. शाळेत बदली करण्यात आली होती. त्यांचे पती प्रशांत मुळे हेदेखील शिक्षक होते. पाच वर्षापूर्वी प्रशांत यांचे निधन झाले होते. त्यानंतर आजी-आजोबांचादेखील मृत्यू झाला. त्यांना एक डॉक्टर मुलगा आहे. तो सध्या पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!