Home » राज्य » अजित पवारांच्या कार्यालयात ‘वाजले की बारा’, ‘मला इश्काच्या झुल्यात झुलवा’ !

अजित पवारांच्या कार्यालयात ‘वाजले की बारा’, ‘मला इश्काच्या झुल्यात झुलवा’ !

नागपूर : वृत्तसंस्था

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात लावणीचे सादरीकरण झाल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात रविवारी (दि २६) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपुरातील मुख्य कार्यालय गणेश पेठ परिसरात असून अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच अजित पवार यांनी कार्यालयाचे उद्घाटन केले होते. या कार्यालयात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नृत्यांचाही कार्यक्रम पार पडला. सोहळ्यादरम्यान ‘वाजले की बारा’, ‘मला इश्काच्या झुल्यात झुलवा’ या लावण्या सादर करण्यात आल्या. नृत्यांगना शिल्पा शाहीर यांनी नृत्य सादर केले. या लावणीला उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून प्रतिसाद दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

पक्षाच्या कार्यालयात अशा प्रकारे लावणीचे सादरीकरण झाल्यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावर स्थानिक नेत्यांनी प्रतिक्रिया देताना शिल्पा शाहीर या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्याचा दावा केला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *