Home » जळगाव » जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या दरोड्याचा उलगडा, 4 आरोपी अटक !

जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या दरोड्याचा उलगडा, 4 आरोपी अटक !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरात एका धाडसी दरोड्याचा खुलासा करत चार संशयित इसमांना  वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जताब्यात घेतले आहे. या आरोपींनी दि. ०९ सप्टेंबर रोजी रावेर रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाच्या डोक्यावर मार करून त्याच्याकडून रोख रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता.

या संशयितांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी तत्काळ पथक तयार करून संशयितांची तातडीने हेराफेरी सुरु केली. जळगाव शहरातील जी.एस ग्राऊंड परिसरात संशयित चार इसमांना विना क्रमांकाची मोटारसायकलसह दिसल्यावर त्यांनी त्यांचा पाठलाग करून पकडले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:  किरण पंडीत हिवरे (वय ३२, रा. भातखेडा, ता. रावेर), अजय सुपडू कोचुरे (वय २५, रा. खिडर्डी, ता. रावेर), हरिष अनिल रायपुरे (वय २५, रा. प्रतापपुरा, बऱ्हाणपुर, मध्यप्रदेश), गोकुळ श्रावण भालेराव (वय २७, रा. डांभुर्णी, ता. यावल). गुन्ह्यातील रोख रक्कम रु. 4,50,000/- हस्तगत करण्यात आली असून, आरोपींकडून दिलेल्या कबुली नुसार, ही रक्कम त्यांच्यामध्ये वाटपासाठी जळगाव येथे जमा केली होती. सदर प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल असून, पुढील तपास लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, जळगावच्या पथकाने केलेल्या या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक महोदय श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शन असून, पोउपनि सोपान गोरे, पोहेकॉ प्रितमकुमार पाटील, यशवंत टहाकळे, बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम यांसह अन्य कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या कारवाईमुळे शहरात सुरक्षा वाढली असून, पोलीस प्रशासनाच्या तत्परतेची दखल घेतली जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *