Home » जळगाव » जळगाव एलसीबीची कारवाई; तेलंगणातून सोन्याचा चोर गजाआड

जळगाव एलसीबीची कारवाई; तेलंगणातून सोन्याचा चोर गजाआड

जळगाव : प्रतिनिधी

खरेदीचा बहाणा करून सोन्याची चेन लांबविणाऱ्या तेलंगणातील चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. भास्कर किसन बानोथ (२२, रा. नगाई पल्ली तांडा, जि. यदाद्री भुवनागिरी, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  सुभाष चौक परिसरातील रतनलाल बाफना ज्वेलर्स (नयनतारा अॅड सन्स) या सराफा दुकानातून ९ जानेवारी रोजी सोन्याची चेन चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तपास सुरू असताना चोरी तेलंगणातील चोरट्याने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.

त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, मुबारक देशमुख व पंकज खडसे यांच्या पथकाने तेलंगणा राज्यातील सायबराबाद येथून भास्कर बानोथ याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने चोरी केलेली सोन्याची चेन वितळवून तिची लगड तयार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याची लगड हस्तगत केली असून पुढील तपास सुरू आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *