Home » राष्ट्रीय » जळगाव मनपा निवडणूक: नामनिर्देशन अर्जांसाठी उमेदवारांची झुंबड

जळगाव मनपा निवडणूक: नामनिर्देशन अर्जांसाठी उमेदवारांची झुंबड

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरु होती. चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांची मुलगी डॉ. अमृता सोनवणे व मुलगा डॉ. गौरव सोनवणे, माजी उपमहापौर कैलास सोनवणे यांची मुलगी प्रतिक्षा सोनवणे, मुलगा कल्पेश सोनवणे, माजी महापौर विष्णु भंगाळे, नितीन लढा, सीमाताई भोळे यांच्यासह माजी नगरसेव व इतर इच्छुकांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

मनपा निवडणुकीसाठी सोमवारी तीन माजी महापौरांनी विष्णु भंगाळे, नितीन लढ्ढा, सीमाताई भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे यांची मुलगी डॉ. अमृता सोनवणे व मुलगा डॉ. गौरव सोनवणे, माजी उपमहापौर कैलास सोनवणे यांची मुलगी प्रतिक्षा सोनवणे, मुलगा कल्पेश सोनवणे, डॉ. चंद्रशेखर पाटील, नितीन बरडे, जितेंद्र मराठे, अॅड. दिलीप पोकळे, सुनिल खडके, मनोज चौधरी, गायत्री राणे यांच्यासह २५० इच्छुकांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

प्रभाग क्रमांक १० मधून ‘अ’ मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कलाबाई नारायण शिरसाठ यांनी अर्ज भरला आहे. परंतु प्रभाग क्रमांक १० मधील सर्व जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात येत असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी उमेदवारी करू नये, म्हणून सांगण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पक्षाचे प्रामाणिक काम करत असल्यामुळे ती जागा माझ्यासाठी सोडा, असे आवाहन आपण पक्षाचे नेते संतोष चौधरी यांना केली होती मात्र, उद्धव बाळासाहेब पक्षांचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील यांनी प्रभाग १० मधील सर्व जागा आम्ही लढवणार असल्याचे सांगितल्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचे कलाबाई शिरसाठ यांनी सांगितले.

मनपा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याकरीता दोन दिवस शिल्लक असल्यामुळे सोमवारी मोठ्या संख्येत इच्छुकांनी गर्दी केली होती. यावेळी महापालिकेच्या गेट समोर खुप मोठी गर्दी झाली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांचे कागदपत्र तपासणी करून अर्ज दाखल करून घेतले जात होते. तपासणीसाठी वेळ लागत असल्यामुळे ४.३० वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याचे काम सुरु होते.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *