Home » जळगाव » जळगाव पोलीस आले अडचणीत : एलसीबीचे पीएसआयचे ड्रग्ज गुन्ह्यातील संशयीताशी मोबाइलवर संवाद !

जळगाव पोलीस आले अडचणीत : एलसीबीचे पीएसआयचे ड्रग्ज गुन्ह्यातील संशयीताशी मोबाइलवर संवाद !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव पोलिस दलातील स्थानिक गुन्हा शाखा या महत्त्वाच्या विभागात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना एलसीबीतून काढून शहराबाहेरील दोन पोलिस ठाण्यात बदली केली. तर पीएसआय पोटेंचा एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील अरबाजशी ३५२ वेळा मोबाइलवर संवाद झाल्याचे समोर आले आहे.

गजानन देशमुख व संदीपाल जाधव अशी बदली करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांची पाचोरा व फत्तेपूर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना प्राप्त झालेल्या तक्रारी व क्लिपच्या आधारे दोघांची गुरुवारी चौकशी करून त्यांची बदली करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. एलसीबीत कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्याबाबत त्यांचे शहरातील एमडी ड्रग्ज विक्रेत्यांसोबत संबंध असल्याबाबत तक्रारीची चौकशी करण्यात आली. पीएसआय पोटे यांचे शहरातील एमडी ड्रग्ज साठा प्रकरणात फरार असलेला व दुबईला पळून गेलेल्या अरबाज या संशयितासोबत ३५२ वेळा फोनवर संवाद झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. गुरुवारी याबाबत पोलिस अधीक्षकांच्या दालनात उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, एलसीबीचे पोलिस निरीक्षक यांच्या चौकशी समितीने याबाबत चौकशी केली. यात पोटे यांच्या मोबाइलच्या डीसीआरमधील संवादाबाबत चौकशी करण्यात आली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *