Home » राष्ट्रीय » मोठी बातमी : अभियंता प्रशांत सोनवणे यांची बदली ; अनेकांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

मोठी बातमी : अभियंता प्रशांत सोनवणे यांची बदली ; अनेकांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

जळगाव : प्रतिनिधी

गेल्या काही वर्षापासून जळगाव जिल्ह्यात नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची आज अखेर उचल बांगडी होऊन त्यांची औरंगाबाद नगर परिषद संचालनाय विभागात बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून माझी मंत्री एकनाथराव खडसे हे नेहमीच प्रशांत सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप करत होते मात्र आता त्यांची बदली झाल्याने सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी या बदलीचे स्वागत केले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे हे गेल्या अनेक वर्षापासून वादात नेहमीच सापडत होते मात्र त्यांच्या बदली होण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी मोठा पाठपुरावा देखील नेहमी सुरू होता आज अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी वाघुर परिसरात एका ठिकाणी सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील सोनवणे यांनी केले होते त्यानंतर त्यांची ही उचल बांगडी झाली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *