मोठी बातमी : अभियंता प्रशांत सोनवणे यांची बदली ; अनेकांच्या पाठपुराव्याला मोठे यश !

जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही वर्षापासून जळगाव जिल्ह्यात नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची आज अखेर उचल बांगडी होऊन त्यांची औरंगाबाद नगर परिषद संचालनाय विभागात बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून माझी मंत्री एकनाथराव खडसे हे नेहमीच प्रशांत सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप करत होते मात्र […]
धक्कादायक : २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील धानवड येथील सतत दारू पिऊन घरी येवून मारहाण करणारा पती आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून एका 22 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. दरम्यान, मुलीला गळफास देवून तिला ठार मारण्यात आले आहे, असा आरोप मयत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येवून अटक […]
जरांगे पाटलांचा गंभीर आरोप : ही दंगल सरकार आणि फडणवीस पुरस्कृत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यभरात काल दि.१७ रोजी अनेक हिंदू संघटनेतर्फे शासनाला निवेदन दिल्यानंतर नागपूर शहरात दंगल घडली होती. या दंगलीबाबत सर्वच विरोधकांनी सरकारला टार्गेट केले असतांना आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नागपूर मध्ये झालेली दंगल ही देवेंद्र फडणवीस पुरस्कृत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला […]
‘हा’ तर एका मोठ्या कटाचा भाग ; आंबेडकरांचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात बजरंग दल व विहिंपचे मोठे आंदोलन सुरु होते मात्र नागपूर येथे आंदोलनानंतर झालेल्या दंगलीमुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. वंचित बहजुन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवरून राज्य सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यांनी राज्यातील एका विषारी मंत्र्याकडून दररोज समाजात द्वेष पसरवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत […]
‘या’ प्रकरणातून छोटा राजनला मिळाली निर्दोष मुक्तता !

मुंबई : वृत्तसंस्था देशाचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या ड्रायव्हरच्या 2011 च्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली. छोटा राजन सध्या तिहार तुरूंगात बंद आहे. त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले होते. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातंर्गत (MCOCA) विशेष न्यायधीश ए. एम. पाटील यांनी राजनची प्रकरणात […]
नागपुरात तणाव : दोन गट आले होते आमने सामने : वाचा काय घडल !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण तापलेले असताना नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी रात्री आठच्या सुमारास दोन गटांत राडा झाला. यानंतर आज कलम १६३ अंतर्गत अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलिस […]
घर खाली केल्याचा वाद : घरमालकाच्या पोटात खुपसला चाकू !

जळगाव : प्रतिनिधी भाडेतत्वावर दिलेले घर खाली करून घेतल्याने त्याचा जाब विचारत घरमालक गलू पुजो पाटील यांच्या पोटात चाकू खूपसून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना दि. १४ मार्च रोजी नशिराबाद येथे घडली. या प्रकरणी प्रमोद नामदेव पाटील (४५, रा. नशिराबाद) याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, […]
उभ्या असलेल्या टँकरवर कार धडकल्याने महिला ठार !

जळगाव : प्रतिनिधी मुलाच्या सासरवाडीतील लोकांसोबत पेंच अभयारण्यात गेलेले लिमये कुटुंबिय घरी येण्यासाठी निघाले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अल्पना लिमये यांनी त्यांच्या आईला फोन करुन घरी येण्यासाठी निघाले असल्याचे सांगितले, आणि अवघ्या अर्ध्या तासात लिमये यांची कार उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर आदळून अल्पना पराग लिमये (वय ५६, रा.रिंगरोड) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवार […]
न्यायालय परिसरात दोन गट आमने-सामने : पोलिसांचा तगडा बंदोबस्त !

जळगाव : प्रतिनिधी लहान मुलांना पळवून नेत असल्या संशयावरुन तलवार घेवून धार्मीक स्थळातील पाण्याचा माठासह प्लास्टीक टाकीची तोडफोड करणाऱ्या संशयित प्रवीण रमेश कोळी (रा. पिंजारीवाडा, वाल्मिक नगर) याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. याठिकाणी दोन्ही गटातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत घोषणाबाजी केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी न्यायालयाच्या आवारात घडला. यामुळे परिसरात ताणावाचे वातावरण निर्माण झाले […]
आर्थिक गुंतवणुकीबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्या.

मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज एखाद्या प्रिय व्यक्तीशी झालेली भेट खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला एखाद्या विशिष्ट कामासाठी प्रेरणा मिळू शकते. उत्पन्न आणि खर्चात योग्य ताळमेळ राहील. तुमच्या कामात समर्पित राहिल्याने यश मिळेल. खरेदी करताना निष्काळजी राहू नका. कोणीतरी तुम्हाला फसवू शकते, ज्यामुळे तुमचे खूप नुकसान होण्याची शक्यता आहे. मुलांच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका. पैशांशी […]