मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व महिलांना तातडीने उपचारासाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या सहा नृत्यांगनांवर ऑगस्ट महिन्यात कारवाई करण्यात आली होती आणि तेव्हापासून त्या सुधारगृहात होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून सुधारगृहात असल्याने त्या नैराश्यात होत्या. याच नैराश्यातून त्यांनी हाताची नस कापून टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे महिला सुधारगृहातील सुरक्षेवर आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
या नृत्यांगना कोल्हापूरात वास्तव्यास होत्या. दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑगस्टमध्ये पोलिसांनी या ६ महिलांवर कारवाई करत काही गुन्ह्याखाली ताब्यात घेतले होते. दरम्यान महिला दोन महिन्यांपासून सुधारगृहात असल्याने आणि जामीन मिळत नसल्याने त्या सर्वच नैराश्येत होत्या, अशी माहिती एका महिलेच्या पतीने दिली आहे. त्यामुळेच त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आले आहे.
