Home » जळगाव » ‘मला माझे जुने मीटर लावून द्या’ म्हणत कर्मचारीला केली शिवीगाळ !

‘मला माझे जुने मीटर लावून द्या’ म्हणत कर्मचारीला केली शिवीगाळ !

जळगाव : प्रतिनिधी

मीटर रीडिंगसह वीज बिलाबाबत असलेल्या करण्यासाठी गेलेले तक्रारीचे निवारण प्रदीप सुनील खवडे (२४, रा. पळासखेडा मिराचे, ता. जामनेर) या महावितरणच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यासह वीज ग्राहकाने मीटर फोडले. वीजवाहिनींवर आसारी फेकून विद्युत पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ४ ऑगस्ट रोजी जळके, ता. जळगाव येथे घडली. याप्रकरणी मंगळवारी (५ ऑगस्ट) राकेश रमेश पाटील (रा. जळके, ता. जळगाव) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीजबिल जास्त आल्याने जळके येथील राकेश पाटील याने मीटर तपासणीसाठी तक्रार केली होती. महावितरणचे कर्मचारी प्रदीप खवडे हे तेथे गेले. वीज मीटरचे रीडिंग व वीज बिलात असलेले रीडिंग सारखे असल्यामुळे वीजबिल कमी करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. राकेश याने ‘मला माझे जुने मीटर लावून द्या’ असे म्हणून कर्मचाऱ्यांसोबत वाद घालून वीज मीटरची तोडफोड केली. कर्मचाऱ्याने त्याला याविषयी विचारले असता, त्याने कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत हातपाय तोडण्याची धमकीदेखील दिली. घडलेला प्रकार प्रदीप खवडे यांनी वरिष्ठांना सांगितला. त्यावेळी लाईनमन संदीप अत्तरदे, अमोल भगत, शिवाजी काळे, दिनेश पाटील हे तोडफोड केलेले मीटर काढण्यासाठी गेले. यावेळी राकेश पाटील याने मीटर काढण्यास विरोध करीत त्यांना पुन्हा शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *