Home » जळगाव » ‘ड्राय डे’च्या दिवशी मद्यसाठा व दोन रिक्षा जप्त

‘ड्राय डे’च्या दिवशी मद्यसाठा व दोन रिक्षा जप्त

जळगाव : प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ड्राय डे असल्याने त्या दिवशी विक्रीसाठी मद्य घेऊन जात असलेल्या दोन रिक्षा चालकांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. शिवाजी नगर उड्डाणपुल व ईच्छादेवी चौकात ही कारवाई करुन मद्यसाठा व दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ तसेच इच्छादेवी चौकात अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकाला कारवाईच्या सूचना मिळाल्यानंतर पथकाने शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ शाहरुख सुपडू शिकलीकर (रा. कानळदा) हा प्रवासी रिक्षामधून (एमएच १९, सीई २७४४) विना परवाना विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याचे पथकाला आढळले. त्यानुसार पथकाने विविध कंपन्यांचे विदेशी मद्य व रिक्षा असा एकूण दोन लाख १६ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दुसऱ्या कारवाईत इच्छादेवी चौकात रितिक रवींद्र बाटुंगे (रा. तांबापुरा) हा रिक्षामधून (एमएच १९, सीडब्ल्यू १३९१) विना परवाना दारूची चोरटी वाहतूक करीत असताना आढळला. त्याच्याकडून विदेशी दारू व रिक्षा असा एकूण एक लाख ९४ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेश मेढे, संजय हिवरकर, पोहेकॉ हरिलाल पाटील अक्रम शेख यांच्या पथकाने केली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *