जळगाव : प्रतिनिधी
राजस्थान येथे आर्मीत कार्यरत असलेले विजय सोनगीर हे सुट्टीवर आले होते, त्यांचा मोबाईल रामानंदनगर परिसरात हरवला होता. त्यानंतर मोबाईल “ज्येष्ठ नागरिक सेवा संघ” या ठिकाणी आढळून आला. मोबाईल महानगरपालिकेतील उपायुक्त मॅडम यांच्या गाडीवर चालक असलेल्या दिलीप पाटील यांना सापडला.

दिलीप पाटील हे मोबाईल मिळाल्यावर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून मोबाईलचा मूळ मालक विजय सोनगीर यांच्याकडे परत करण्यात आला. मोबाईल परत मिळवण्याच्या प्रक्रियेत हेड कॉन्स्टेबल ३३३४ प्रमोद पाटील आणि होमगार्ड सचिन वाघ यांनी देखील सक्रियपणे सहभाग घेतला.विविध घटकांच्या तत्परतेमुळे विजय सोनगीर यांना हरवलेला मोबाईल त्वरित मिळाला, ज्यामुळे नागरिकांना सुरक्षा आणि प्रशासनाच्या तत्परतेची जाणवली.



