Home » जळगाव » पोलिसांची मोठी कारवाई : अवैध कत्तलखाना केला उद्धवस्त !

पोलिसांची मोठी कारवाई : अवैध कत्तलखाना केला उद्धवस्त !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील फैजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन अवैध कत्तलखाना उद्धवस्त करण्यात आला. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर शहरातील मिल्लतनगर मशीदीजवळ शेख नईम ऊर्फ नम्मा अब्दुल रहीम कुरेशी यांच्या घरास लागुन पत्राच्या शेडमध्ये अवैधरित्या गुरांची (गोवंश जातीच्या प्राण्यांची) कत्तल केली जात असून येथे कत्तलखाना सुरु आहे. या माहितीवरुन फैजपुर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. रामेश्वर मोताळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील मिल्लतनगर नगर भागात जावन सापळा रचला. तसेच दोन पंचासमक्ष खात्री झाल्यानंतर छापा टाकला. या वेळी तेथे फैजपूर येथीलच ईकराम शेख नईम कुरेशी (वय २१, रा. मिल्लतनगर), वसीम शेख अब्दुल रहीम कुरेशी (वय ४६, रा. कुरेशी मोहल्ला) व शेख मुस्तकीम शेख कलीम (वय ४०, रा. कुरेशी मोहल्ला) हे तिघे आढळून आले. या वेळी तेथे ३९ हजार ६०० रुपयांचे २२० किलो मांस, ५०० रुपयांचे २३ किलो चामडे, १ हजार ४०० रुपयांची वजनमामे, ३०० रुपयांची लोखंडी कुऱ्हाड, २०० रुपयांचा लोखंडी सुरा यांच्यासह १० हजारांचा गोऱ्हा असा ५२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी तेथे पशू वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून तपासणी करीता मिळालेल्या मांसचे सॅम्पल काढुन उर्वरीत मांस जमिनीत परुन नष्ट केले. तसेच पंचनामा केला.

या प्रकरणी पो.हे.कॉ. रवींद्र काशिनाथ मोरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. या प्रकरणी फैजपुर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स.पो.नि. रामेश्वर मोताळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. विनोद गाभणे करत आहेत. दरम्यान, ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शानानुसार स.पो.नि. रामेश्वर मोताळे, पो.उ.नि. विनोद गाभणे, स.फौ. अरुण नमायते, पो.हे.कॉ. रवींद्र मोरे, पो. हे.कॉ. सलीम तडवी, पो.हे.कॉ. अनिल पाटील, पो.हे.कॉ. मोती पवार, पो.हे.कॉ. देवेंद्र पाटील, पो.हे.कॉ. ज्ञानेश्वर चौधरी, पो.हे.कॉ. मदिना तडवी. पो.ना. समाधान पाटील, पो.कॉ. प्रशांत चिरमाडे, राहुल नावकर तसेच होमगार्ड यांनी केली.

 

 

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *