Home » जळगाव » विवाहितेने संपविले आयुष्य : पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

विवाहितेने संपविले आयुष्य : पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी

सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून प्रतीक्षा चेतन शेळके या विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या प्रतीक्षा शेळके या विवाहितेने सुसाईड नोट लिहून १८ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी विवाहितेचे वडील भागवत पांडुरंग धामणे (४८, रा. शिरसोली प्र. न.) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावे तसेच विवाहितेचा गर्भपात करण्यासाठी तिचा छळ केला जात होता. यामुळे प्रतीक्षाने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरून विवाहितेचा पती चेतन राजेंद्र शेळके, सासरे राजेंद्र नारायण शेळके, सासू वैशाली राजेंद्र शेळके, दीर गौरव राजेंद्र शेळके (सर्व रा. खरजई, ता. चाळीसगाव), मावस सासरे दिनेश पाटील व मावस सासू छाया दिनेश पाटील (दोघ रा. जारगाव चौफुली, ता. पाचोरा) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनिल वाघ करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *