Home » जळगाव » चहाच्या दुकानात जोरदार स्फोट : १३ जण जखमी !

चहाच्या दुकानात जोरदार स्फोट : १३ जण जखमी !

भडगाव : प्रतिनिधी

येथील पारोळा चौफुलीवरील ‘मिलन टी हाऊस’ या उपाहारगृहात रविवारी दुपारी डीप-फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा जोरदार स्फोट होऊन हॉटेलमालक व त्याच्या मुलासह १३ जण जखमी झाले आहेत. त्यांतील काहींची प्रकृती गंभीर आहे.

सविस्तर वृत्त असे कि, हॉटेलचालक शेख रफिक शेख रज्जाक (५०), त्यांचा मुलगा सोहिल शेख रफिक मणियार (२८, दोघे रा. ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव), ग. स. सोसायटीचे माजी उपाध्यक्ष रवींद्र मुकुंदराव सोनवणे (५६, रा. बाळद रोड, भडगाव), इकबाल शेख गनी (४०, रा. गंजी वाडा, भडगाव), एजाजोद्दीन रियाजद्दीन मुल्ला (३२, रा. जलाली मोहल्ला, भडगाव), मोहसीन शेख शब्बीर (३३, रा. ग्रीन पार्क कॉलनी), दिलीप भटा ठाकरे (६०, रा. साईनगर, भडगाव), भूषण प्रकाश पाटील (३४, रा. जुवार्डी, ता. भडगाव), राजकुमार मोतीराम पवार (२८, रा. बिदर, कर्नाटक), मयूर पदमसिंग पाटील (२८, वडधे, ता. भडगाव), राहुल बापू पाटील (४०, रा. जामदे, ता. चाळीसगाव), अमोल गोविंद शिंदे (३४, रा. वळूज, जि. सातारा) आणि गजानन दिगंबर उजेड (२८, रा. वडगाव, ता. जालना) यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

याठिकाणी किमान १२ ते १३ लोक चहा पिण्यासाठी थांबलेले होते. ते सर्वजण या स्फोटात जखमी झाले आहेत. आवाज होताच सर्वजण घाबरून बाहेर पळाले; पण यातील अनेकजण गंभीर आहेत. जखमींना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पाचोरा, जळगाव व धुळे येथील खासगी व शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली. रुग्णवाहिका चालक निळू पाटील, भैया पाटील, सागर पाटील व गोलू शिंदे यांनी जखमींना वेळेत रुग्णालयात दाखल केले. आमदार किशोर पाटील यांनी जखमींच्या नातेवाइकांची भेट घेतली. तसेच, रुग्णालयात जाऊन उपचार व्यवस्था पाहणी केली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *