जळगाव : प्रतिनिधी
जळगाव येथील महाबळ स्टॉप जवळील साई प्लाझा कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत भाजीपाल्याचे दुकान रौद्ररूप धारण करून काही क्षणांतच उद्ध्वस्त झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजीपाला दुकानासोबतच शेजारी साई भूषण बेकरी आहे. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाठवण्यात आले. अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने दाखल झाले आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात येत असून, रात्री उशिरापर्यंत रामानंद पोलिसांकडे कोणतीही तक्रार नोंदलेली नव्हती. आग लागण्याची कारणे शॉर्टसर्किट असल्याचे प्राथमिक अंदाज आहे, मात्र तपासानंतरच नेमके नुकसान व कारण निश्चित केले जाणार आहे.



