Home » महाराष्ट्र » महाराष्ट्रात मायक्रोसॉफ्टची भव्य जीसीसी सेंटर; ४५ हजार रोजगारांची निर्मिती ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा !

महाराष्ट्रात मायक्रोसॉफ्टची भव्य जीसीसी सेंटर; ४५ हजार रोजगारांची निर्मिती ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा !

नागपूर  : वृत्तसंस्था

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांची मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांच्यासोबत एक महत्वाची बैठक पार पडली आहे. ही बैठक संपल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. बैठीकत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत त्यांनी सविस्तर सांगितले आहे. अधिवेशन सुरू असताना अचानक मुंबईत मुख्यमंत्री दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले होते.

मायक्रोसॉफ्टकडून मुंबईत मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच मायक्रोसॉफ्टसोबत GCC Global Capability Centers (ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर) हा महत्वकांशी प्रकल्प करण्याचा प्रयत्न राज्य सरकाराचा आहे. त्यानुसार 20 लाख स्क्वेअर फुटांची जीसीसी महाराष्ट्रात उभारण्यात येईल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. यामुळे ४५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यानी स्पष्ट केले आहे. मायक्रोसॉफ्ट भारतात 17.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. ही या कंपनीची आत्तापर्यंतची सर्वांत मोठी गुंतवणूक असणार आहे. याचा वापर AI, क्लाउड आणि डेटा सेंटर यांसारख्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी करण्यात येणार आहे. ही गुंतवणुकीच्या दृष्टीने एक मोठं पाऊल असणार आहे.

मायक्रोस्फॅाटचे सीइओ काय म्हणाले?

ही आशियातील आमची आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. यामुळे भारतात AI साठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण होतील, लाखो लोकांना नवीन कौशल्ये शिकवली जातील आणि आपला डेटा आपल्याकडे सुरक्षित ठेवण्याची ताकदही मिळेल, असे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी सांगितले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *