जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कुसुंबा गावात गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या चेतन वसंता देवुळकार (वय २२, रा. कुसुंबा) या संशयिताच्या एमआयडीसी पोलीसांनी सोमवारी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्याप्रमाणात खळबळ उडाली होती.

कुसुंबा गावात एक तरूण गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ गणेश ठाकरे, नितीन ठाकूर, विशाल कोळी यांचे पथक रवाना केले. या पथकाने कारवाई करीत संशयित चेतन वसंता देवुळकार याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या घरातून गावठी बनावटीचा कट्टा पोलीसांनी जप्त केला. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



