Home » जळगाव » अल्पवयीन मुलीला ठेवले गर्भवती ; गुन्हा दाखल !

अल्पवयीन मुलीला ठेवले गर्भवती ; गुन्हा दाखल !

अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, १४ वर्षे ८ महिने वय असलेली पिडीता आपल्या बहिणीच्या सासरी राहायला गेली असता तिची ओळख अजय सुकलाल मोरे (२१) याच्याशी झाली होती. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध झाले. पीडितेचे आई-वडील, भाऊ कामानिमित्त बाहेर गेलेले असताना अजय मोरे हा आपल्या गावातून या पिडितेच्या गावी येत होता व तिच्यावर अत्याचार करत होता. पीडितेने विरोध केला असता तो तिच्या आईवडिलांना सांगायची धमकी देत होता. त्यामुळे पीडिता त्याला विरोध करत नव्हती. कालांतराने पीडिता गर्भवती राहिली. बहिणीने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सर्व प्रकरण उघडकीस आले. वैद्यकीय चाचणी केली असता ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले. अजय मोरे याला अटक करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *