Home » महाराष्ट्र » मोठी बातमी : जळगाव जिल्हा पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटील !

मोठी बातमी : जळगाव जिल्हा पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले होते तर गेल्या काही दिवसापासून प्रतीक्षेत असलेली पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तर, अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्यासोबतच पुण्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंकत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे.

जिल्हानिहाय पालकमंत्री
गडचिरोली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे, बीड- उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर ,अमरावती- चंद्रशेखर बावनकुळे
वाशीम- हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील
रायगड- आदिती तटकरे
आहिल्यानगर- राधाकृष्ण विखे-पाटील
पालघर- गणेश नाईक
जालना- पंकजा मुंडे
सातारा- शंभूराज देसाई
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर- माधूरी मिसाळ
लातूर- शिवेंद्रराजे भोसले
सोलापूर- जयकुमार गोरे
छत्रपती संभाजी नगर- संजय शिरसाट
मुंबई उपनगर- आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा
रत्नागिरी- उदय सामंत
नाशिक – गिरीश महाजन
सिंधुदुर्ग- नितेश राणे
हिंगोली – नरहरी झिरवळ
बुलढाणा- मकरंद जाधव -पाटील
अकोला – आकाश फुंडकर
नांदेड- अतुल सावे
धुळे – जयकुमार रावल
जळगाव- गुलाबराव पाटील
यवतमाळ- संजय राठोड
चंद्रपूर – अशोक उईके

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *