Home » राष्ट्रीय » एनआयएची मोठी कारवाई : दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक !

एनआयएची मोठी कारवाई : दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठे यश मिळाले आहे. पाकिस्तानातून आलेल्या लष्कर-ए-तोयबा (एलईटी) च्या दहशतवाद्यांना आश्रय देण्यात सहभागी असलेल्या दोघांना एजन्सीने अटक केली आहे. दहशतवादी हल्ल्यापूर्वी या दहशतवाद्यांनी पूर्ण नियोजन करून आश्रय दिला होता. धार्मिक ओळखीच्या आधारे पर्यटकांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे हा हल्ला आणखी क्रूर आणि वेदनादायक मानला जात आहे.

अटक केलेल्यांची नावे परवेझ अहमद जोथर (बटकोट, पहलगाम) आणि बशीर अहमद जोथर (हिल पार्क, पहलगाम) अशी आहेत. एनआयएच्या तपासात असे दिसून आले आहे की, या दोघांनी हल्ल्यापूर्वी त्यांच्या परिसरातील एका तात्पुरत्या झोपडीत (ढोक) तीन सशस्त्र दहशतवाद्यांना राहायला ठेवले होते, त्यांना जेवण दिले होते आणि आवश्यक वस्तू पुरवल्या होत्या.

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला दोन महिने उलटले आहेत, परंतु २६ निष्पाप पर्यटकांना मारणारे चार दहशतवादी अजूनही सुरक्षा दलांच्या आवाक्याबाहेर आहेत. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आणि भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. तरीही, मुख्य गुन्हेगारांना अटक करण्यात झालेल्या विलंबामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २७ एप्रिल रोजी या प्रकरणाचा तपास हाती घेतला, परंतु दोन महिन्यांनंतरही चार मुख्य दहशतवादी फरार आहेत.

७ मे २०२५ रोजी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या कारवाईत राफेल, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि एस-४०० संरक्षण प्रणाली वापरून पाकिस्तान आणि पीओकेमधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. पहलगामचा डोंगराळ प्रदेश आणि घनदाट जंगले दहशतवाद्यांना लपण्यासाठी अनुकूल आहेत. गुप्त माहितीच्या अभावामुळे हल्लेखोर अजूनही पळून जात आहेत. हे हल्लेखोर पीओकेमध्ये लपले असावेत, जिथे त्यांना पाकिस्तानी सैन्याच्या गुप्त संमतीने संरक्षण मिळत आहे.

स्थानिक पाठिंबा आणि लष्कर आणि टीआरएफचे स्लीपर सेल नेटवर्क तपास गुंतागुंतीचा करत आहेत. १२ मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये झालेल्या चर्चेनंतर युद्धबंदी जाहीर करण्यात आली होती, परंतु दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. ८ मे रोजी बीएसएफने पीओकेमधील एक दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त केला. जम्मू आणि काश्मीरमधील ४८ पर्यटन स्थळे बंद आहेत आणि १५ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने म्हटले आहे की पैशाशिवाय हा हल्ला शक्य नव्हता. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद निधीची चौकशी अधिक कडक केली जणारराअहे. तसेच ते दहशतवादी निधीला तोंड देण्यासाठी देशांनी उचललेल्या पावलांवर लक्ष ठेवेल आणि लवकरच राज्य पुरस्कृत दहशतवादासह दहशतवादी निधी प्रकरणांवर एक अहवाल प्रसिद्ध करेल असेही म्हटले आहे. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचा निषेध हा आंतरराष्ट्रीय समुदायावरील या हल्ल्याच्या गांभीर्याचा पुरावा आहे. दहशतवादी हल्ल्यांमुळे जगभरात मृत्यू, दुखापत आणि भीती निर्माण होते. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेला क्रूर दहशतवादी हल्ला हा गंभीर चिंतेचा विषय आहे. त्याचा निषेध केला पाहिजे. दहशतवादी समर्थकांच्या पैशा आणि निधीशिवाय असे हल्ले होऊ शकले नसते.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *