Home » राष्ट्रीय » “जळगावात चेन नव्हे, अंगठ्या गायब : एका महिलेने तीन दुकानांतून ४.७० लाखांचे सोनं लंपास” !

“जळगावात चेन नव्हे, अंगठ्या गायब : एका महिलेने तीन दुकानांतून ४.७० लाखांचे सोनं लंपास” !

जळगाव : प्रतिनिधी 

एका महिलेने हातचलाखीने शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांतून एकाच दिवशी ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही चोरीच्या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एकाच अनोळखी महिलेने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  आर. सी. बाफना ज्वेलर्सचे (सुभाष चौक) व्यवस्थापक गणेश राजाराम काळे (रा. अयोध्या नगर) यांनी याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आर. सी. बाफना यांच्या ४ नोव्हेंबर रोजी लक्षात आले की, अंगठीच्या ट्रेमध्ये २२ कॅरेट सोन्याच्या अंगठीच्या जागी नकली अंगठी ठेवलेली आहे. सीसीटीव्ही तपासले असता, दि. २७ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली एक महिला दुकानात आली होती. तिने १० ते १२ ग्रॅम वजनाच्या अंगठ्या दाखवायला सांगितल्या. संशयित महिला अंगठ्या बघत असताना, शिरीष जैन हे काढण्यासाठी खाली वाकले होते. नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन त्या महिलेने १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या बोटात घातल्या आणि त्याऐवजी तिच्याकडील दोन नकली अंगठ्या ट्रेमध्ये ठेवल्या.

शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेले गणेश काळे यांना तेथे भंगाळे गोल्ड ज्वेलर्सचे मॅनेजर संतोष चव्हाण देखील भेटले. त्यांच्या दुकानातही २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५:३० वाजता याच वर्णनाच्या महिलेने हातचलाखी करून १ लाख ४५ हजार रुपये किमतीची १३ ग्रॅम ५४० मिली वजनाची सोन्याची अंगठी चोरल्याचे समोर आले. अशा प्रकारे एकाच महिलेने केवळ अर्ध्या तासाच्या अंतरात दोन्ही दुकानांतून एकूण ३ सोन्याच्या अंगठ्या (३२ ग्रॅमच्या आसपास) लंपास केल्या असून, त्यांची एकूण किंमत ३ लाख ३० हजार आहे. दोन्ही ज्वेलर्सच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

जिल्हापेठ पोलिस ठाण्यात १ नोव्हेंबर रोजी दाखल गुन्ह्यांनुसार २७ ऑक्टोबर रोजीच सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान एका अज्ञात महिलेने पु. ना. गाडगीळ अॅड. सन्स या पेठीतून १ लाख ४० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची अंगठी चोरून नेल्याची घटना घडली होती, त्यानुसार एकाच दिवशी या टोळीने शहरातील तिन्ही मोठ्या ज्वेलर्स शॉपमधून नकली अंगठ्या ठेवून, सोन्याच्या अंगठ्या लांबविल्या असल्याचे उघड झाले आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *