Home » जळगाव » गावठी कट्ट्यासह एक जण अटक : कुसुंबा शिवारात पोलिसांची कारवाई !

गावठी कट्ट्यासह एक जण अटक : कुसुंबा शिवारात पोलिसांची कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी

शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा शिवारात गावठी कट्टा घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी सशस्त्र कारवाई करत अटक केली. ही कारवाई एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने 30 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास केली.

मिळालेल्या माहितीनुसार,  पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कुसुंबा येथील दोस्ती पान सेंटरजवळ एक इसम गावठी कट्ट्याचा धाक दाखवत असल्याचे कळताच, त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पो.उप.नि. राहुल तायडे, पो.उप.नि. चंद्रकांत धनके, पो.ना. गणेश ठाकरे, पो.ना. किरण पाटील, पो.ना. नितीन ठाकूर व पो.ना. राहुल घेटे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांची गाडी पाहून संशयिताने पळ काढला. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अमोल सुरेश खैरनार (वय 28, रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या डाव्या कमरेला गावठी कट्टा लावलेला आढळून आला. सदर कट्टा घटनास्थळी पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत 10,000 रुपये आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई राहुल घेटे यांनी सरकारतर्फे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयिताविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3/25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पो.हे.कॉ. रामदास कुंभार हे करीत असून, ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *