न्यायालयाने दिले मुंबईतील आंदोलकांना हटवण्याचे आदेश !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या चार दिवसापासून आझाद मैदान येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू केले आहे. तसेच संपूर्ण मुंबईत मोठ्या संख्येने राज्यभरातून मराठा समाज जमा झाला आहे. तसेच रविवारी मनोज जरांगे यांनी आपण मरेपर्यंत उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु, जरांगेंच्या या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी […]
ब्रेकिंग : जळगाव येतांना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे हल्ला झाला आहे. त्यांनी स्वतःच एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या हल्ल्यात नेमक्या कोणत्या प्रकारचे नुकसान झाले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले असताना ही घटना घडल्यामुळे […]
संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये ‘आपलं विद्यालय : आपला स्वाभिमान’ उपक्रमा अंतर्गत सेवा सन्मान पुरस्कार 2025

जळगाव : प्रतिनिधी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये १ सप्टेंबर रोजी शाळांमध्ये ‘आपलं विद्यालय आपला स्वाभिमान’ या संकल्प दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी विविध संकल्प घेतले.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, शिस्त, परंपरा यासारख्या उच्च मूल्यांची जाणीव झाली. शाळेतील उपशिक्षिका शितल कोळी यांना तसेच संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांच्या […]
मराठा आरक्षणावरून हायकोर्टाने ओढले राज्य सरकारवर ताशेरे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषण आणि आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने (हायकोर्ट) कठोर भूमिका घेतली आहे. आज (१ सप्टेंबर) सुट्टी असतानाही तातडीची सुनावणी घेण्यात आली. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. एमी फाउंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवर आधारित या प्रकरणात कोर्टाने […]
गावठी कट्ट्यासह एक जण अटक : कुसुंबा शिवारात पोलिसांची कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा शिवारात गावठी कट्टा घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी सशस्त्र कारवाई करत अटक केली. ही कारवाई एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने 30 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास केली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कुसुंबा येथील दोस्ती पान सेंटरजवळ एक इसम गावठी कट्ट्याचा […]
आनंदाची बातमी : सिलिंडरचे दर तब्बल ५१ रुपयांनी झाले स्वस्त !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता महिन्याच्या पहिल्याच दिवशी हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण १ सप्टेंबरपासून १९ किलो वजनाचा एलपीजी (LPG) सिलिंडर तब्बल ५१.५० रूपयांनी स्वस्त झाला आहे. याआधी ऑगस्टमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली होती. तर घरगुती १४ किलो वजनाच्या गॅस सिलिंडर […]
माजी नगरसेवक चौधरी प्राणघातक हल्लाप्रकरणी : तीन संशयितांची काढली धिंड !

चाळीसगाव : प्रतिनिधी भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणी तीन जणांना शनिवारी अटक करण्यात आली. त्यांनी हल्ला केला त्याच भागातून त्यांची धिंड काढण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, सोमा उर्फ सागर दगडू चौधरी (३०), सनी उर्फ हरीष आबा पाटील (२०) आणि गौरव आधार चौधरी (१९, सर्व रा. चाळीसगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे […]
आई, पती, बहीण, प्रियकराने दिला अल्पवयीन मुलीला त्रास !

जळगाव : प्रतिनिधी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील आईसह चुलत बहीण व मेहुण्याने तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर पतीने मारहाण केल्याने बहिणीकडे निघून आलेली ही मुलगी नंतर प्रियकरासोबत गेली. त्यादरम्यान त्यांच्यात शरीर संबंध आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वरील तिघे तसेच पती, त्याच्या नातेवाइकांसह मुलीचा प्रियकर व मदत करणारे, अशा एकूण १० […]
तरुणाच्या खून प्रकरणी दोन संशयित अटकेत !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दहीगाव येथे इम्रान युनूस पटेल (२१, रा. दहीगाव) या तरुणाच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांना यावल न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस या गुन्ह्याचे मूळ कारण शोधत आहेत आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, यावल-विरावली रस्त्यावरील खारवा […]
धावत्या बस चालकाला हृदयविकाराचा झटका !

जळगाव : प्रतिनिधी बोदवड-भुसावळ दरम्यान धावत्या बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले. बस सरळ रस्त्याच्या बाजूला विजेच्या खांबावर आणि नंतर झाडाला आदळली मात्र या अपघातात बसमधील पंधरा प्रवासी बचावले आहेत. ही थरारक घटना भानखेडा, ता. बोदवड नजीक रविवारी दुपारी ३ वाजता घडली. भुसावळ आगाराची ही बस एन. डी. पाटील नावाचे चालक चालवत […]